Pune Crime News : ‘तुझ्यामुळे साडेसाती लागली’ म्हणत सासरच्यांकडून छळ

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून एका 28 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गलफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी कोंढव्यात घडली. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

काजल सागर झेंडे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मयत विवाहितेची आई मुक्ताबाई मोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पती सागर दत्तू झेंडे (वय 29),सासू कौशल्या दत्तू झेंडे (वय 57) ननंद दिपाली भारत पवार (वय 37) आणि रुपाली मलिंद गरुड या चार जणांना अटक केली आहे तर सोनाली मोरे इच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की काजल यांचे 2013 मध्ये सागर झेंडे त्याच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून घरातील किरकोळ कारणावरून भांडण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जायचा. तू पांढऱ्या पायची आहेस, तू आमच्या घरी आल्यापासून आम्हाला साडेसाती लागली आहे असे करून वारंवार मारहाण करून तिचा मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून काजल हिने 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.