Talawade news : तळवडेमधून एकाला मारहाण करून अपहरण

एमपीसी न्यूज : तळवडेमधून (Talawade news) एकास मारहाण करून पळवून नेल्याची घटना घडली. अमजदअली खान यांचे काल दुपारी त्रिवेणीनगर चौकामधील सार्वजनिक रोडवर रुपीनगर येथून अपहरण करण्यात आले आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dange Chowk : तेल गळतीमुळे वीसपेक्षा अधिक दुचाकी घसरल्या दुचाकीस्वार जखमी

या प्रकरणात चार अनोळखी इसम आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात भा. द. वि. कलम 365, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे पती अमजदअली खान त्यांच्या मोटर सायकलवरून जात असताना त्रिवेणीनगर चौकाजवळ आले होते. तेथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या कारमधील चार इसमांनी त्यांना थांबवले. त्यांना (Talawade news) हाताने मारहाण करून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून बळजबरीने त्यांना उचलून कारमध्ये टाकून अपहरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.