Tathwade Crime : मित्रानेच केला तडीपार गुंडावर चाकूने हल्ला

एमपीसी न्यूज : मित्रानेच तडीपार गुंडावर जुन्या वादातून हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना तथावडे (Tathawade Crime) येथे घडली.

रविराज केदार (वय अंदाजे 25 वर्षे, रा. वाकड) या तडीपार गुंडावर काल रात्री 9 च्या  सुमारास त्याच्या मित्राने चाकूने  हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सत्यवान माने (वाकड पोलीस ठाणे) यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याने अधिक माहिती देता येत नाही.

Nigdi : ऑफिसमध्ये घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक

प्राथमिक माहितीनुसार, रविराज केदार या गुंडास एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पण तो शहरात आला व त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हा हल्ला ताथवडे येथील अशोक नगरमध्ये करण्यात आला होता. जखमी गुंडाला प्रथम आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. नंतर त्याला अधिक उपचारासाठी दुसऱ्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.