Bhosari Crime News : पैसे स्वीकारून मुदतीत फ्लॅट दिला नाही म्हणून फसवणुकीचा गुन्हा 

एमपीसी न्यूज – पैसे स्वीकारून मुदतीत फ्लॅट दिला नाही म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 2013 ते 22 मे 202  1 दरम्यान भोसरी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिगंबर ज्ञानदेव पाटील (रा.निगडी प्राधिकरण) व कृष्णा प्रसाद (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहन दादासाहेब शिंदे (वय 54, रा. वानवडी) यांनी भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.22) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात फिर्यादी यांच्या कडून 11 लाख रुपये स्वीकारले. आरोपींनी ठरलेल्या मुदतीत फ्लॅट न देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली असं फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.