Pune News : बाणेर परिसरातून चक्क मोबाईल टॉवरच चोरून नेले

एमपीसी न्यूज : चोरटे कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. पुण्यातील बाणेर परिसरातून चोरट्यांनी चक्क मोबाईलचे बसविलेले टॉवर अन त्याचे साहित्यच चोरून नेले. मॉडेल कॉलनी आणि पाषाण भागात या घटना घडल्या असून, पोलीसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, सध्या मोबाईल टॉवर चोरीच्या प्रकरणाने परिसरात चांगलीच चर्चा रंगविली आहे.

याप्रकरणी देवेंद्र कुंभलकर (वय ४१, रा. वडगाव शेरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०२१ आणि दुसरा प्रकार एप्रिल २०२१ या कालावधीत घडला आहे. तक्रारदारांनी न्यायालयात चोरीबाबत दाद मागितली होती. न्यायालयाने गुन्हा दाखलकरून अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे पोलीसांना दिले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार देवेंद्र जीटीएल या कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. कंपनीने पाषाण परिसरात मोबाईल टॉवर उभारले होते. त्या जागेवर कोणीतरी अतिक्रमण करुन तेथील संपूर्ण मोबाईल टॉवर, डिझेल जनरेटर बॅटरी बँक व इतर उपकरणे असा २० लाख १९ हजार ७५९ रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हे मोबाईल टॉवर कसे चोरीला गेले कोणी चोरले. हे मोबाईल टॉवर कधीपासून बंद पडले, याविषयी काहीही माहिती कंपनीकडून पोलिसांना देण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.