Pune News : माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिन्याला तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यासाठी आरोपीकडून धमकावले जात होते. पोलीसांनी 3 हजार घेताना त्यांना रंगेहात पकडले.

इफराज फिरोज शेख (वय 30, रा. येरवडा) आणि तुषार विष्णु आढवडे (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  विमाननगर परिसरात चहा, कॉफीचे मटेरियल पुरविणाऱ्या व्यावसायिकाचा कामगार गाडी घेऊन येथील फिल्ड बिल्डींगच्या आऊट गेटला आला असता आरोपींनी त्याची गाडी अडविली. आम्ही माथाडी कामगार आहोत. आम्ही माथाडीचे कोणतेही काम करणार नाही. परंतु, तुला आम्हाला प्रत्येक ट्रिप मागे 500 रुपये द्यावे लागतील. तु जोपर्यंत पैसे देणार नाही. तोपर्यंत तुझी गाडी आत जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती.

तसेच, वेळोवेळी त्यांना धमकावत महिन्याला 3 हजार रुपये देण्यासाठी त्रास दिला जात होता. याप्रकरणी त्यांनी खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाला तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी या तक्रारीची चौकशी केली असता त्यात खंडणी मागत असल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने याठिकाणी सापळा रचून इफराज व तुषार या दोघांना 3 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.