India Corona Update : ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या मागील 205 दिवसातील निचांकी 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 21 हजार 257 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 24 हजार 963 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून ती अडीच लाखाच्या खाली आली आहे. मागील 205 दिवसातील हा निचांक आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 39 लाख 15 हजार 569 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 32 लाख 25 हजार 221 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.96 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या देशात 2 लाख 40 हजार 221 ॲक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशात 271 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 50 हजार 127 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 58 कोटी 43 हजार 190 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 85 हजार 706 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 93 कोटी 17 लाख 17 हजार 191 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 50.17 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.