Wakad News : गांजा बाळगल्या प्रकरणी महिलेला अटक; पावणे तीन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका 62 वर्षीय महिलेला अटक केली आहे. महिलेकडून दोन किलो 722 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 7) दुपारी सव्वाबारा वाजता काळाखडक, वाकड येथे करण्यात आली.

राधा बाळू फडतरे (वय 62, रा. काळाखडक, वाकड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला राधा फडतरे हिच्याकडे पोलिसांना दोन किलो 722 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांना आढळून आला. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने याप्रकरणी 68 हजार 50 रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंगारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.