Chinchwad News : बेकायदेशीरपणे बाळगलेला चार पिस्टल, चार काडतुसे, दोन कोयते, एक तलवार असा शस्त्रसाठा जप्त

तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सात जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी आळंदी, निगडी, पिंपरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आळंदी येथील गुन्ह्यात चार पिस्टल, चार काडतुसे, निगडी येथील गुन्ह्यात दोन कोयते आणि पिंपरी येथील गुन्ह्यात एक तलवार असा शस्त्रसाठा पोलीसांनी जप्त केला आहे.

सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय 27, रा. सोळू, ता. खेड) याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ याने बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगली असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि. 7) दुपारी पाच  सोळू गावातील आळंदी ते मरकळ रोडवरील दर्ग्याजवळ सापळा लावून सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे चार पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख 22 हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपी सोमनाथ याने हे पिस्टल विक्रीसाठी आणले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गांगड तपास करीत आहेत.

रोहित आश्रुबा आव्हाड (वय 2, रा. दुर्गानगर, चिंचवड), निलेश अरुण चित्ते (वय 23, रा. आंबेडकरनगर झोपडपट्टी, चिंचवड) या दोघांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहित याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विलास केकाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर चिंचवड येथील बंडगार्डन येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि. 7) मध्यरात्री सव्वाबारा वाजता सापळा लावून कारवाई केली. त्यात रोहित याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे. त्याचा दुसरा साथीदार निलेश हा पळून गेला. दरम्यान पोलिसांनी निलेश याच्याकडून देखील एक कोयता जप्त केला आहे. पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत.

शुभम कैलास हजारे (वय 23), यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय 21), सुशांत अनिल जाधव (वय 19, तिघे रा. पिंपरी), निखिल ओव्हाळ (वय 23, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नितीन गेंगजे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेकायदेशीरपणे तलवार जवळ बाळगताना आढळून आले आहे. त्यांच्याकडून 500 रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली आहे. यातील आरोपी शुभम याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस हवालदार उंबरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.