Pune News : कोंढव्यात मारहाण करून तरुणाचा फोन हिसकावला

एमपीसी न्यूज : कोंढव्यातील कुमार पृथ्वी सोसायटी जवळून पायी निघालेल्या एका तरुणाला फोन लावण्यासाठी मोबाईल मागून घेतला. त्यानंतर त्याला फोन परत न करता मारहाण करून फोन घेऊन चोरटे पळून गेले. 29 मे रोजी ही घटना घडली. 

याप्रकरणी यश बाबासाहेब सोनवणे (वय 19) या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तीन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की 29 मे रोजी फिर्यादी तरुण हा कुमार पृथ्वी सोसायटी जवळून पायी जात होता. यावेळी त्याच्याजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फोन लावण्यासाठी मोबाईल मागून घेतला. त्यांचे बोलणे झाल्यानंतर फिर्यादीने मोबाईल परत मागितला असता शिवनेरी नगर येथे जाऊन फोन लावायचा आहे असे सांगून त्याला कोंढवा येथील आयडियल बेकरी येथे घेऊन गेले.

त्या ठिकाणी त्यांचा आणखी एक साथीदार आला आणि त्यांनी फिर्यादी यांना मोबाईल देणार नाही असे सांगून हाताने तोंडावर पाठीवर पोटावर मारहाण केली आणि मोबाईल बळजबरीने चोरी करून घेऊन गेले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.