Bhosari Crime News : चारित्र्यावर संशय, घाणेरडे व्हॉस्टअप स्टेटस ठेऊन विवाहितेचा छळ, विवाहितेच्या बहिणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – माहेरून पैसे आणण्यासाठी, चारित्र्यावर संशय घेऊन घाणरडे व्हॉस्पअप स्टेटस् ठेऊन विवाहितेचा छळ केला. तसेच, विवाहितेच्या आईचे 21 तोळ्याचे दागिने गहाण ठेवत फसवणूक करून, बहिणीचा विनयभंग केला. डिसेंबर 2018 ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत इंद्रायणी नगर, भोसरी येथे ही घटना घडली.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विवाहित महिलेचा पती, सासु – सासरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 498 अ, 420, 354, 324, 323, 500, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने बँकेत नोकरी लागल्याचे खोटे कागदपत्रे दाखवून चांगला पगार मिळत असल्याचे सांगत फसवणूक केली. माहेरून पैसे आण्यासाठी, चारित्र्यावर संशय घेऊन घाणरडे व्हॉस्पअप स्टेटस् ठेऊन फिर्यादी विवाहितेचा छळ केला. तसेच, विवाहितेच्या आईचे 21 तोळ्याचे दागिने गहाण ठेवत फसवणूक करून, बहिणीचा विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी पतीला अटक केली असून, भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.