Chinchwad Crime News : ऐकाल तर नवलंच! ….म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – हुंडा दिला नाही, विवाहितेला मुलगी झाली आणि मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमात सासरच्या लोकांचा चांगला मानपान केला नाही. या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अमोल जीवन जाधवराव (वय 40, रा. वारजे माळवाडी), सासू (वय 65) आणि नणंद यांच्या विरोधात पीडित विवाहितेने फिर्याद दिली. हा प्रकार फेब्रुवारी 2015 ते सन 2020 या कालावधीत वारजे माळवाडी आणि लिंक रोड चिंचवड येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या लग्नात माहेरच्या लोकांनी व्यवस्थित मानपान केला नाही. पुरेसा हुंडा दिला नाही. या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. हाताने मारहाण व शिवीगाळ करून त्रास दिला.

मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमात सासरच्या लोकांचा चांगला मानपान केला नाही. यावरून विवाहितेच्या आई वडिलांना शिवीगाळ केली. ‘तुम्हाला सांगितलेली पैशाची सोय झाली आहे का. आम्हाला मुलगा पाहिजे होता. तुला तर मुलगी झाली आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या मुलीमध्ये काही रस नाही’ असे बोलून भांडण करून आरोपी निघून गेले.

दरम्यान, आरोपी पतीला मानसिक आजार असल्याचे फिर्यादी विवाहिता व त्यांच्यात माहेरच्या लोकांपासून लपवून ठेऊन त्याचे लग्न फिर्यादीसोबत लावून फसवणूक केली. पतीच्या मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी सासूने फिर्यादीच्या आई वडिलांकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. ते पैसे फिर्यादीचे आई – वडील देऊ शकले नाहीत, यावरून आरोपींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.