Vehicle Theft : चाकण तळेगाव परिसरातून तीन दुचाकी वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण आणि तळेगाव परिसरातून तीन दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात मुबारक बनूमिया शेख (वय 40, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / सी व्ही 7392) रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लाॅक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवनाथ तानाजी पडवळ (वय 39, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / डी व्ही 6228) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 4) सकाळी उघडकीस आला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

संजय नामदेव वर्वे (वय 29, रा. तिकोनापेठ, पवनानगर, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एफ झेड 5949) शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलसमोर पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी पार्किंग मधून चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 4) पहाटे चार वाजता उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.