Today’s Horoscope 9 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 9 September 2022

वार – शुक्रवार

तारीख 9-9-2022

शुभाशुभ विचार- 18 पर्यंत चांगला दिवस

आज विशेष – अनंत चतुर्दशी

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल

आजचे नक्षत्र – धनिष्ठा 11.35 पर्यंत नंतर शततारका

आजची चंद्रारशी – कुंभ

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने सकारात्मकच विचार करा. तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय योग्य ठरणार आहेत. आज काही दुरावलेले जिवलग मित्र जवळ येतील.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

नोकरदारांना वरिष्ठांच्या दडपणात काम करावे लागेल.अधिकारी वर्गास अधिकार वापरायची संधी मिळेल.कार्यक्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत परिश्रम आवश्यक आहेत.मित्रांना थोडे लांबच ठेवा.

मिथुन – (शुभ रंग – मोरपंखी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस आहे.नोकरीत वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील.आज हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात जाऊ नका.कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क – (शुभ रंग – मोतिया)

आज फक्त आपल्या भल्याचाच तेवढा विचार करा.भावनेच्या आहारी जाऊन कुणालाही शब्द देऊ नका.आज जोडीदाराच्या चुका काढू नका.वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका.

सिंह – (शुभ रंग- डाळिंबी)

आपल्या मर्यादेत रहा.अति आक्रमकतेने नुकसान होईल.महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा सतर्क रहा.

कन्या – (शुभ रंग – मरून)

कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे आहे.नव्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीतील नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

तूळ – (शुभ रंग – अबोली)

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल.स्वतःचे लाड पुरवण्यासाठी मनसोक्त खर्च कराल.शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित जर तुमचे व्यवसाय असतील तर ते तेजीत चालतील.कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

वृश्चिक – (शुभ रंग – पिस्ता)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही खरेदी विक्रीचे व्यवहार रखडले असतील तर ते मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता होईल.प्रेम प्रकरणे मात्र फक्त मनस्ताप देतील.

धनु – (शुभ रंग – भगवा)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.रिकामटेकडी चर्चा फक्त वादास कारणीभूत होईल.शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. आज काम कमी आणि दगदगच जास्त होईल.

मकर – (शुभ रंग – जांभळा)

दुकानदारांच्या गल्ल्यात आज लक्षणीय वाढ होईल. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल.कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. दुपारनंतर अकस्मिक लाभ.

कुंभ – (शुभ रंग – लाल)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील.अति उत्साहात चुकीचे निर्णय घेणार आहात. दूरचे प्रवास त्रासदायक होतील.आज स्वतःचेच खरे कराल हट्टीपणाने वागाल.

मीन – (शुभ रंग – पांढरा)

पर्यटन व्यवसाय चांगले चालतील.पासपोर्ट, विजा वगैरे  विदेशाशी संबंधित कामे गती घेतील. कठोर बोलण्याने नाती दुखावतील.अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.काहींचा गूढशास्त्रांकडे कल राहील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.