Pune News : जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, जलतरण तलाव व मैदाने सोमवारपासून खुली होणार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर निर्बंध काही प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून (दि.24) जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, जलतरण तलाव, मैदाने पर्यटन स्थळावरील दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ‘या’बाबत आज रविवारी (दि.23) आदेश जारी केले आहेत.

  •  पुणे ग्रामीण भागातील सर्व मैदाने खुली करण्यास परवानगी
  • खेळाडूंना सरावासाठी अटी शर्ती सह जलतरण तलाव खुले करण्यास परवानगी
  • मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक
  • पुणे व खडकी छावणी परिषदेत पुणे महानगरपालिकेची तर देहुरोड छावणी परिषदेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नियम लागू राहणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.