Kalewadi News : दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असताना अचानक दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 3 जुलै रोजी दुपारी काळेवाडी येथे घडली.

ज्ञानेश्वर सुरज दूधभाते (वय 27 रा. निर्मल कॉलनी, रहाटणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मयत ज्ञानेश्वर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार बिरादार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मयत ज्ञानेश्वर हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी मेट्रो हॉस्पिटलच्या पुढे नखाते पेट्रोल पंपासमोर आली असता भरधाव वेगातील दुचाकी घसरली. या अपघातात ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.