Vehicle theft : सांगवी, चाकण मधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – सांगवी येथून बुलेट तर चाकण येथून (Vehicle theft)  होंडा कंपनीची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 13) सांगवी आणि चाकण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संजोग सुभेराज साठे (वय 20, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची बुलेट दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बुलेट दुचाकी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

PCMC News : आयुक्तांच्या दुबई दौऱ्यास शिवसेनेचा विरोध

गजानन प्रेमसिंग राठोड (वय 30, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड यांची 15 हजारांची दुचाकी अज्ञातांनी चाकण येथील (Vehicle theft) प्रास हॉस्पिटल समोरून चोरून नेली. ही घटना गुरुवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजताच्या कालावधीत घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.