मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Vadgaon Court News : महिलेवर अत्याचार प्रकरणातील वकिलाचा जामीन अर्ज नामंजूर

एमपीसी न्यूज – फसवणुकीचा व बलात्काराचा गुन्हा (Vadgaon Court News) दाखल होऊ नये म्हणून पोलिसांच्या उपस्थितीत लग्न करून दुसऱ्या दिवशी बायकोला तिच्या माहेरी सोडून परागंदा झालेल्या नवरदेवाचा जामीन अर्ज वडगाव मावळ न्यायालयाने आज (शुक्रवारी) नामंजूर केला. त्यामुळे संबंधित वकिलाच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या एकूण 136 पोलीस अंमलदारांची पदोन्नती झाल्याने सत्कार

लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून वडगाव मावळ न्यायालयात दावा सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ॲड. श्रेयस श्रीराम पेंडसे याला देण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केला होता.

संबंधित आरोपी पोलीस ठाण्यात बोलवून देखील उपस्थित राहिला नाही तसेच न्यायालयातील सुनावणीसही गैरहजर राहिल्याची बाब पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही बाजूंचा व्यक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ आवारे व चंद्रकिरण (Vadgaon Court News) मोकाशी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पोलीस उपायुक्त (परिमंडल दोन) आनंद भोईटे व तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड  व पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन लांडगे यांचे आभार मानले.

Latest news
Related news