Pimpri News: पशुवैद्यकीयच्या समस्या निवारणासाठी हेल्पलाईन नंबर

150 तक्रारी सोडविल्या

एमपीसी न्यूज :  पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने स्वतंत्र हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. या माध्यमातून 150 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

मोकाट जनावरांमुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, यासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. शहरातील 8 प्रभाग हद्दीतील नेमकी आणि महत्वाची माहिती, समस्या त्वरीत पशु वैद्यकीय विभागाला कळाव्यात आणि त्यावर लगेच कारवाई केली जावी. यासाठी विभगाचा स्वत:चा हेल्पलाइन नंबर ऑक्‍टोबर महिन्यात देण्यात आला आहे.

पशुवैद्यकीय विभागाने नव्याने सुरु केलेल्या 8856874747 या हेल्पलाइन नंबरवर शहरातील विविध भागातून तक्रारी येतात. त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. समस्या कुठल्या प्रभागातील आणि कशा प्रकारची आहे. याबाबत माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना दिली जाते. त्यानुसार कारवाई केली जात असल्याचे पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

काही समस्या महापालिकेच्या सारथी या संकेतस्थळावर येतात. तेथील आणि हेल्पलाइन नंबरवरील समस्या सोडवण्यात येत आहे. यामुळे नेमकी समस्या काय आणि काय तयारीने संबधित भागात जायचे याबाबत स्पष्ट माहिती कर्मचाऱ्यांना मिळत आहे. आतापर्यंत या हेल्पलाइन नंबरवरुन 150 जणांच्या समस्या सोडवण्यात आल्या आहे. शहरवासीयांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात येईल, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.