गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Wakad : महिलेला कामावर ठेऊ नका म्हणून तिची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेचा पाठलाग करून ती काम करत असलेल्या दुकानाच्या मालकांना (Wakad) तिच्याबद्दल अपशब्द सांगून तिला कामावरून काढून टाका म्हणून तिची बदनामी करणाऱ्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून महिन्यापासून सुरु होता.

तुषार वर्मा (वय अंदाजे 35 रा.वाकड) याच्यावर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे जवळ-जवळ राहतात. आरोपी हा फिर्यादीचा पाठलाग करतो व फिर्यादी काम करत असलेल्या दुकान किंवा शोरूमच्या मालकाला फिर्यादीला कामावरून काढून टाका म्हणून त्यांच्याबद्दल अपशब्द सांगतो.

Hadapsar : हडपसर येथे जुन्या कालव्यात पडली कार

फिर्यादी यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून काम सोडले. पुढे त्या दुसऱ्या (Wakad) एका ठिकाणी काम करत असताना त्याने त्याही दुकानाच्या मालकाला व्हॉटसअपवरून कॉल करून फिर्यादीबद्दल अपशब्द वापरून तिला कामावरून काढून टाकण्यास सांगितले. तसेच या आधीही फिर्यादीला तिच्या वागणूकीमुळे कामावरून काढून टाकले होते. तिला कशाला कामावर ठेवता काढून टाका, सांगत फिर्यादीची बदनामी केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Latest news
Related news