Pune News : ज्या औरंगजेबाने वडील आणि भावांची कत्तल केली त्याचे उदात्तीकरण कशासाठी? अमोल कोल्हे यांचा ओवैसींवर निशाणा

एमपीसी न्यूज – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून आता अकबरुद्दीन ओवेसी हे विविध राजकीय नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी देखील या प्रकरणावरून आता अकबरुद्दीन ओवेसीवर निशाणा साधला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना हालहाल करून मारले, स्वतःच्या भावंडाची कत्तल केली त्या माणसाच्या कबरीचं दर्शन करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेव पाहत आहे. त्या माणसाचे उदात्तीकरण का करताय असा प्रश्न त्यांनी विचारला. पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत जश्न-ए-ईद-मिलन हा राष्ट्रीय एकात्मता मिळाला पार पडला, या मेळाव्यात अमोल कोल्हे बोलत होते.

तर याच विषयावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील ओवेसीवर टीका केली आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले आजवर कोणी च्या कबरी चे दर्शन घेतले नाही. मात्र एमआयएममच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रुढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका खैरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.