Pimpri News: महापौरांसाठी खरेदी करणार 20 लाखांची आलिशान मोटार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्यासाठी मेसर्स टोयाटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादित कंपनीकडून थेट पद्धतीने आलिशान मोटार खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी येणा-या 20 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

कोरोना महामारी काळात सातत्याने शहरभर करणाऱ्या महापौर उषा ढोरे यांचे वाहन जुने झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी केली जाणार आहे. महापौरांसाठी योग्य ते वाहन मर्यादित किमतीत घेण्याचे बंधन आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाचा त्याबाबत नियम आहे. त्यानुसार महापौरांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मोटारींची किंमत मर्यादा 20 लाख रुपये निश्चित केली आहे.

महापौरांना वापरण्याकरिता पुरविण्यात आलेले वाहन जुने झाले आहे. त्यांना शासकीय दराने जेम पोर्टलच्या दरानुसार मेसर्स टोयाटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादित कंपनीकडून थेट पद्धतीने करारनामा न करता 20 लाख रुपये खर्चून वाहन खरेदी करावे. वाहन उत्पादित कंपनीकडून ज्यादा सुविधा बसवाव्यात आणि येणाच्या प्रत्यक्ष खर्चास मान्यता द्यावी, असे स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.