World Bamboo Day : जागतिक बांबू दिनानिमीत्त पुण्यात ‘चक्र’ बांबूच्या अनोख्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – लोणी काढणाऱ्या ताकाच्या रवीपासून ते अवकाशात उडणाऱ्या विमानापर्यंत, चक्राची मानवाच्या आयुष्यातील उन्नती दाखवणाऱ्या अनेक अनोख्या गोष्टींच्या बांबूतील (World Bamboo Day) प्रतिकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे.

जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधून ‘चक्र’ या तीन दिवसीय प्रदर्शन पुण्यातील घोले रोड येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वनराईचे सचिव अमित वाडेकर यांच्या हस्ते झाले.

जे.जे. महाविद्यालयातील कला शाखेतून उत्तीर्ण झालेले (World Bamboo Day) रमेश दाते, हे गेली 40 वर्षे बांबू सारख्या आव्हानात्मक विषयात अभ्यास आणि वाखाणण्याजोगे काम करत आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध बांबूरुपी प्रतिकृतींचे प्रदर्शन सोमवारी (दि.19) व मंगळवारी (दि.20) सकाळी अकरा ते रात्री आठ पाहण्यास उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.