CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पूजेनंतर भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भिमाशंकर देवस्थानला दर्शनासाठी जाताना ठिकठिकाणी गावात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. पुणे ते भिमाशंकर हे अंतर पार करताना त्यांनी तळेगाव, राजगुरूनगर, मंचर, घोडेगाव, आंबेगाव, लांडेवाडी येथे शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्थानिक नागरिक स्वागतासाठी उभे होते.

मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनसामान्यांचा नेता मुख्यमंत्री झाल्याचे समाधान या समयी लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसले. असे वक्तव्य त्यांनी केले.

Eknath Shinde in Talegaon : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तळेगाव येथे सत्कार

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,उपविभागीय अधिकारी सारंग कोडीलकर, कार्यकारी विश्वस्त तथा तहसिलदार वैशाली वाघमारे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, संतोष गवांदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.