Dehuroad Corona Update : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत (दि. 18) एकूण 30 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.  रविवारी एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. हद्दीतील सक्रिय रुग्णांची संख्या 300 वर जाऊन पोहोचली आहे. हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची संख्या 2074 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅंटोन्मेंट हद्दीत सक्रिय रुग्णांचा आणि नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, आज एका 76 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने रविवारी सायंकाळी 7.20 वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 48 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 1735 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

होम आयसोलेशनमध्ये 208 रुग्ण आहेत. महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये 43 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 42 मृत्यूंची नोंद झाली आहे

रविवारी आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

मेन बाजार (6), चिंचोली (2), थॉमस कॉलनी (2), संकल्प नगरी (2)(रॉयल कॉम्प्लेक्स), वृंदावन सोसायटी (3), शेलारवाडी (4), दत्तनगर (2), श्रीकृष्ण नगर (1), बरलोटा नगर (6) (मोहित बिल्डिंग, सरला बिल्डिंग), शीतलानगर नं 1 (2) येथील आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. विशेष करून चिंचोली गावातील रुग्णांची संख्या वाढत आहे. या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी देहूरोड छावणी यांच्या आदेशानव्ये कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल देहूरोड यांच्या वतीने चिचोंली गावात कोविड 19 आजारासाठी रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट दि 19 एप्रिल 21 रोजी चिंचोली आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे. संसर्गाचे निदान लवकर झाल्यास घरातच राहून उपचार घेता येतात. उपचार वेळत घेवून खबरदारी घेतल्यास कोरोनाला आपल्याला रोखता येईल. तरी नागरिकांनी उस्फुर्तपणे तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.