India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या 13.36 लाखांवर, मृतांची संख्या 31हजारांच्या पुढे
India Corona Update: Corona toll rises to 13.36 lakh, death toll rises to 31,000 मागील 24 तासांत देशात 757 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 31,358 वर जाऊन पोहचली आहे.
एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशभरात 48,916 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13,36,861 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशात 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी 4,56,071 सक्रिय रुग्ण आहेत तर 8,49,432 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आहेत. मागील 24 तासांत देशभरातून 32,233 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात 757 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 31,358 वर जाऊन पोहचली आहे.
Single-day spike of 48,916 positive cases & 757 deaths in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 13,36,861 including 4,56,071 active cases, 8,49,431 cured/discharged/migrated & 31,358 deaths: Health Ministry pic.twitter.com/HPEz5soYu0
— ANI (@ANI) July 25, 2020
The total number of #COVID19 samples tested up to 24th July is 1,58,49,068 including 4,20,898 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/po5oswaJkN
— ANI (@ANI) July 25, 2020