India Corona Update : चोवीस तासांत 46,951 नवे कोरोना रुग्ण
महाराष्ट्रासह सहा राज्यात सर्वाधिक रुग्ण वाढ
एमपीसी न्यूज – देशात कोरोनाची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 46 हजार 951 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. विशेष म्हणजे या पैकी 84 टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांतील आहेत. एकट्या महाराष्ट्रात रविवारी 30 हजार 335 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 46 हजार 951 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 16 लाख 46 हजार 081 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 11 लाख 51 हजार 468 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 21 हजार 180 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
India reports 46,951 new #COVID19 cases, 21,180 recoveries and 212 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,16,46,081
Total recoveries: 1,11,51,468
Active cases: 3,34,646
Death toll: 1,59,967Total vaccination: 4,50,65,998 pic.twitter.com/cPgjpOh3xv
— ANI (@ANI) March 22, 2021
देशात सध्या 3 लाख 34 हजार 646 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशात 212 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 59 हजार 967 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.75 टक्के एवढं झाले आहे.
आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 23 कोटी 44 लाख 45 हजार 774 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 80 हजार 665 चाचण्या रविवारी (दि. 21) रोजी करण्यात आल्या आहेत.
COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/oZCs4Xnp5w
— ICMR (@ICMRDELHI) March 22, 2021
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी 50 लाख 65 हजार 998 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.