India Corona Update : कोरोनाचा उद्रेक ! चोवीस तासांत 59,118 नवे रुग्ण, 257 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून रुग्ण दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 59 हजार 118 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 18 लाख 46 हजार 652 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 12 लाख 64 हजार 667 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 32 हजार 987 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के एवढं झाले आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 23 कोटी 86 लाख 04 हजार 638 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 756 चाचण्या गुरुवारी (दि. 25) करण्यात आल्या आहेत.

देशात सध्या 4 लाख 21 हजार 066 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 60 हजार 949 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा आहे‌.

 साडे पाच लाख नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 5 कोटी 55 लाख 04 हजार 440 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. एक एप्रिल पासून देशात 45 वर्षांवरील सर्वांना लस टोचण्यात येणार आहे. 45 सर्वांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन सरकारने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.