India Corona Update : गेल्या 24 तासांत 3,57,229 नवे रुग्ण, बाधितांची संख्या दोन कोटींवर

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 57 हजार 229 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 02 लाख 82 हजार 833 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 20 हजार 289 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 81.77 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 34 लाख 47 हजार 133 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 3 हजार 449 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 22 हजार 408 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 29 कोटी 33 लाख 10 हजार 779 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 16 लाख 63 हजार 742 चाचण्या सोमवारी (दि.03) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.