India Corona Update : गेल्या चोवीस तासांत 41,649 नवे रुग्ण, 593 मृत्यू
एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 41 हजार 649 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, 593 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून बरे होणा-या रुग्णांची संख्या कमी झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा चार लाखांपेक्षा अधिक झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 16 लाख 13 हजार 993 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 07 लाख 81 हजार 263 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 37 हजार 291 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
India reports 41,649 new #COVID19 cases, 37,291 recoveries, and 593 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 3,16,13,993
Active cases: 4,08,920
Total recoveries: 3,07,81,263
Death toll: 4,23,810Total vaccination: 46,15,18,479 pic.twitter.com/ZwC3fUVTu4
— ANI (@ANI) July 31, 2021
देशात सध्या 4 लाख 08 हजार 920 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 23 हजार 810 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 593 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
देशात आजवर 46 कोटी 64 लाख 27 हजार 038 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 76 हजार 315 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/pTQDHdz0kF
— ICMR (@ICMRDELHI) July 31, 2021