Pune News : तक्रार अर्ज दिल्याच्या रागातून एकावर कोयत्याने हल्ला, महापालिकेचे अभियंते, ठेकेदारासह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून ठेकेदाराने एका व्यक्तीवर पुण्यातील सावरकर भवन येथील मोकळ्या जागेत कोयत्याने वार केले. गुरुवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी संदीप चंद्रकांत ओझा (वय 38) यांनी फिर्याद दिली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कॉन्ट्रॅक्टर लालू काळूराम देवकर, त्याचा भाऊ, पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील उपअभियंता दलित बेंद्रे आणि अभियंता प्रकाश कुंभार यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी संदीप ओझा आहे गुरुवारी दुपारच्या सुमारास पुणे महापालिकेतील ड्रेनेज विभागात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यामुळे आपल्या विरोधात तक्रार दिल्याचा राग मनात धरून आरोपी लालू देवकर आणि त्याच्या भावाने फिर्यादीवरून जीवघेणा हल्ला केला.

आज तुला मारून टाकतो असे म्हणून आरोपी देवकर यांनी तिला तिच्या उजव्या डोक्यावर कोयता मारला तर लालू देवकरच्या भावाने फिर्यादीच्या  बरगडीवर फायटर ने मारून जखमी केले. तर पालिकेच्या ड्रेनेज विभागातील उपअभियंता आणि आपल्याला असणाऱ्या इतर दूर आरोपींनी काळूराम देवकर आणि त्याच्या भावाला मदत केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.