Wakad Crime News : लिलाव भिशीच्या नावाखाली पैसे घेऊन पावणे चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – लिलाव भिशी चालवण्याचा बहाणा करून एका महिलेने महिलांकडून पैसे घेतले. त्यातील दोन महिलांकडून तीन लाख 80 हजार रुपये घेऊन त्यांना त्यांचे पैसे परत न देता फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी 2017 पासून मार्च 2020 या कालावधीत नढेनगर, काळेवाडी येथे घडला.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 14) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नढेनगर, काळेवाडी येथे राहणा-या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने लिलाव भिशी चालवण्याचा बहाणा करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एक लाख 70 हजार रुपये, त्यांच्या मैत्रिणीकडून दोन लाख 10 हजार रुपये घेतले. तसेच इतरही लोकांकडून भिशीसाठी पैसे घेतले. सर्वांचे पैसे परत न करता आरोपी महिलेने फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.