Bhosari News : एमआयडीसी टी ब्लॉक मधील रस्त्याची दुरावस्था, अपघातांना निमंत्रण

एमपीसी न्यूज – एमआयडीसी टी ब्लॉक मधील रस्त्याची दुरावस्था झाली असून, हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साठून राहिले आहेत तर काही ठिकाणी चिखल साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

एमआयडीसीमध्ये कामाला येणारे कामगार तसेच सामान्य नागरिक यांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यात वाहन अडकल्याने अपघात होत आहेत तसेच पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असून कामगारांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.

लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली असून या रस्त्यावर गतीरोधक देखील टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.