Streets For People : ‘स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज’ 11 विजेत्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवडचा समावेश

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ चॅलेंज अर्थात जनतेसाठी पदपथ या स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेअंती 11 शहरांना पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 4 शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 38 शहरांचे प्रस्ताव दाखल झाले होते.

शहरांतील वाहन-केंद्री रस्त्यांचे लोक-केंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने वर्ष 2006 मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील शिफारसींच्या धर्तीवर 2020 पासून सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोक-स्नेही बनविण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात येतात.

‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या 11 शहरांची निवड केली असून त्यांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेण्यात आली.

‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आघाडी घेतली असून ज्या चार शहरांची पुढच्या फेरीसाठी निवड झाली आहे.

पुणे

पुणे प्रशासनाने अनेक रस्त्यांच्या, बाजूच्या मोकळ्या जागा वापरून नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, परिसरात हास्यवर्गांचे, संगीत सत्रांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा निर्माण करणे अशा अनेक नव्या उपक्रमांनी रस्त्यांच्या आजूबाजूची जागा उपयोगात आणली.

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड प्रशासनाने त्यांच्या रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून त्यांच्या शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणाऱ्या शहरव्यापी हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती देखील प्रायोगिक तत्वावर करण्यात आली. या शहरात चालणे आणि सायकल चालविणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुधारणा केल्या आहेत.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.