Pimpri Corona Update : दिलासादायक! महापालिका रुग्णालयात कोरोना रुग्णसंख्या शून्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. शहराच्या विविध भागातील 22 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजमितीला महापालिका रुग्णालयात एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 304 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 84 सक्रिय रुग्ण असून हे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. महापालिका रुग्णालयामध्ये एकही रुग्ण दाखल नाही.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 5 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 731 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 35 लाख 23 हजार 984 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.