Rupali Thombre : केतकी चितळेला चोपणार म्हणजे चोपणारच- रुपाली ठोंबरे

एमपीसी न्यूज – पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre) यांनी देखील पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी केतकी चितळेच्या पोस्टबद्दल संताप व्यक्त करत, आपण तिला चोप देणार असल्याचं सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. शरद पवारांविषयी अतिशय गलिच्छ आणि खालच्या भाषेत या पोस्टमध्ये टिपणी करण्यात आली. दुसऱ्याच एका व्यक्तीची ही पोस्ट केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.

यानंतर केतकी चितळे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या रडारवर आली आहे. राज्यभरातून तिच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) म्हणाल्या, आमच्या साहेबांविषयी बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. तिच्या या बोलण्यातून आई – वडिलांनी केलेले संस्कार कमी पडत असल्याचे दिसून येते. केतकी चितळेसारख्या चिल्लर व्यक्तीने अशा प्रकारे टीका केल्याने शरद पवारांना काहीही फरक पडत नाही, परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र फरक पडतो. त्यामुळे केतकी चितळे हिला राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी चोप देणार म्हणजे देणारच, असा निर्धार रुपाली ठोंबरे यांनी बोलून दाखवला.

दरम्यान केतकी चितळे हिने केलेल्या फेसबुक पोस्टवरून संपूर्ण राज्यात गदारोळ उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तिच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात देखील तक्रार दिली असून केतकी चितळेला अटक करण्याची मागणी केली आहे.

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.