Hinjawadi Prostitution Case : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथे एका हॉटेलवर छापा मारून कारवाई करत हिंजवडी (Hinjawadi Prostitution Case) पोलिसांनी दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांसह सहा जणांच्या विरोधात वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18 मे) दुपारी पावणे चार वाजता लक्ष्मी चौकाजवळ हिंजवडी येथे हॉटेल आर. के. एक्सक्लुजीव येथे करण्यात आली.

शुभम राजेंद्र ढेरे (वय 28, रा. नेकनूर, ता. जि. बीड), योगेंद्र बाळू कुंभार (वय 27, रा. हिंजवडी), सुनील मदार उर्फ राहुल, उर्फ जीजू, संजीत अमरनाथ सिंग, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम आणि योगेंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. लॉजमध्ये अडकवून ठेऊन त्या महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी बुधवारी दुपारी हॉटेलवर छापा मारून (Hinjawadi Prostitution Case) कारवाई केली. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.