Chikhali Robbery Case : चिखलीतून मोटरसायकलची चोरी, एकावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – चिखलीतून (Chikhali Robbery Case) पार्क केलेल्या मोटारसायकची चोरी झाली. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत योगेश गाडगे, वय 31 वर्षे, रा. चिखली यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमविरोधात भा. द. वि कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीने 22 जून रोजी रात्री 9.15 ते 9.45 च्या दरम्यान एस बी चौक, चिंचवड- चिखली रोड वर त्यांची 20,000 रुपये किंमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल पार्क केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय मोटारसायकल चोरी (Chikhali Robbery Case) करून नेली.