supreme court hearing : राज्यातील सत्तेबाबत आज ‘सर्वोच्च’ सुनावणी

एमपीसी न्यूज – राज्यातील सत्तेबाबतची सुनावणी आजपासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.हे प्रकरणा घटनात्मकदृष्ट्या खूप महत्वाचे असल्याचे निरीक्षण व्यक्त करीत रमणा यांनी तीन सदस्यीय खंडपाठाची (supreme court hearing) स्थापना केली.आमदार पात्र अपात्रतेपासून पक्ष नेतृत्व आणि विधिमंडळाचे नेतृत्व यांच्या अधिकारांवर देखील सुनावणीच्या निमित्ताने सखोल वादप्रतिवाद होणार आहेत. या निर्णायाचे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.

 

शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या आमदारांची पात्र अपात्रता, पक्षांतरबंदी,विधिमंडळाचे गटनेता- प्रतोद कोण येथपासून ते निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह कोणाचे याबाबत सुनावणी घेण्यास मनाई करण्याच्या याचिकेपर्यंतच्या सुमारे नऊ याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे.

 

न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणत्याही निर्णय घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलैच्या निकालात दिले होते. तसेच केंद्रीय निवडणुक आयोगाने देखील शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्ष आणि चिन्ह याबाबत प्रतिज्ञापत्राव्दारे आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्याला देखील तात्पुरती स्थगिती न्यायालयाने (supreme court hearing) दिली होती, त्याविरोधीत एकनाथ शिंदे गटाने खरी शिवसेना कोणाची हे ठरविण्याची मुभा केंद्रीय निवडणुक आयोगाला द्या आणि आयोगाच्या सुनावणीला स्थगिती मागणारी याचिका फेटाळून लावा अशी विनंती प्रतिज्ञापत्राव्दारे केली आहे त्याबाबतचे महत्वाचे निर्देश आज न्यायालयाकडून मिळण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.