Chakan Crime : चाकण येथे 82 हजार रुपयांची घरफोडी
एमपीसी न्यूज – चाकण (Chakan Crime) येथे पहाटे दोन ते चार या केवळ दोन तासाच्या अतंरात घरातून 82 हजार रुपयांची चोरी झाली आहे. ही घटना रविवारी (दि.2) पहाटे चाकण येथील गांडेकरवस्ती येथे घडला.
सनमुख बसय्या स्वामी (वय 34 रा. चाकण, मुळ अक्कलकोट) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Talegaon Dabhade : संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिर उत्साहात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या (Chakan Crime) घरात आतून कडी लावून झोपले होते. मात्र पहाटे दोन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील 65 हजार रुपयांचे दोन तोळ्याचे दागिने, 7 हजार रुपये रोख व 10 हजार रुपयांचा मोबाईल असा 82 हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.