Pune News : कात्रज परिसरात चहा विक्रेत्याने पोलीसाची कॉलर पकडली

एमपीसी न्यूज : मास्क परिधान न करता चहा विक्री करणार्‍यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शेलार मळा जवळ गुरुवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई गणेश खंडू काळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून आरोपी तुत्रिक संतोष घोडके, विक्रम मानसिंग मोटे आणि सुधीर देवराम उदार यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी गुरुवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पेट्रोलिंग करत असताना त्यांना आरोपी मास्क परिधान न करता चहा विक्री करत असताना दिसून आले. फिर्यादी त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी गेले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून, अंगावर धावून जाऊन पूर्ण गणवेशात असताना त्यांच्या शर्टची कॉलर गळ्यासह पकडली.

फिर्यादीच्या गळ्यावर नखाने ओरखडे काढून पावती करणार नाही असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.