Pune Crime News : चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीवर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली

एमपीसी न्यूज : चित्रपटात काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका 25 वर्षीय अभिनेत्री सोबत वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पुण्याच्या वारजे परिसरात ही घटना घडली. अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर एका महिलेसह तिघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभिजीत गणपत साठे (वय 34), एक महिला आणि आणखी एका पुरुषाचा आरोपींमध्ये समावेश आहे. 25 वर्षीय अभिनेत्रीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. वारजे पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2017 ते  जुलै 2021 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एमपी अभिजीत साठे यांनी फिर्यादी सोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर एकांतातील फोटो व्हायरल करण्याची व ब्लू फिल्म बनवण्याची धमकी देऊन वारंवार तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले.

तरी इतर आरोपींनी संगणमत करून फिर्यादीला चित्रपटात काम, फोटोशूट कंपनी काढून देण्याची भूलथापा देऊन तिच्याकडून सहा लाख 41 हजार रुपये घेतले. नंतर फिर्यादीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आणखी दहा लाख रुपये खंडणी मागितली होती. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.