Pune Crime News : नानासाहेब गायकवाड आणि कुटुंबीयांवर आणखी एक गुन्हा दाखल

डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून सह्या घेतल्याचा आरोप

एमपीसी न्यूज : पुण्याच्या औंध परिसरातील उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथील एका तरुणाची जमीन लाटण्यासाठी त्याच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सहा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे, दीपक गवारे, राजू उर्फ अंकुश दादा, सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथील एका 62 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या मुलाने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाच्या पैशाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीची रायगड येथील सात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील फिर्यादी च्या नावावर असलेली जागा स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी डिसेंबर 2020मध्ये त्यांच्या मुलाला येथील आपल्या राहत्या घरी बोलावले.

त्या ठिकाणी आरोपी नानासाहेब गायकवाड यांनी त्यांच्याजवळ रिवॉल्वरने हवेत गोळीबार करून फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सह्या व अंगठे घेऊन त्यांना डेक्कन येथील आरोपी सोनाली गवारे तिच्या घरात काही काळ डांबून ठेवत मारहाण केली होती. असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. चतुशृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.