Pune News : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पत्नीसह फिरणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : पोलिस अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांचा युनिफॉर्म घालून पत्नीच्या बँकिंग परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या एकाला वानवडी पोलिसांनी अटक केली. भाऊसाहेब महादेव गोयकर (वय -25 वर्षे, रा. गुरव पिंपरी, थीटे वाडी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वानवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना संशयास्पद अवस्थेत पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती दिसला. त्याच्या खांद्यावर ‘मपो’ ऐवजी मपोसे असे लावले होते. त्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पोलीस नसल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने सांगितले की लॉकडाऊनमध्ये आपण पोलिस भरतीत आले आहोत असे खोटे पत्नीला सांगितले होते. त्यामुळे पत्नीला खरे वाटावे म्हणून तो युनिफॉर्म घालून रामटेकडी येथे पत्नीसोबत बँकिंगच्या परीक्षेसाठी आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.