India Corona Update : गेल्या 24 तासांत 30,254 नवे कोरोना रुग्ण, 391 मृत्यू 

एमपीसी न्यूज :  गेल्या 24 तासांत देशभरात 30 हजार 254 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 98 लाख 57 हजार 029 एवढी झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 93 लाख 57 हजार 464 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 56 हजार 546 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 391 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 1 लाख 43 हजार 019 एवढी झाली आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 15 कोटी 37 लाख 11 हजार 833 नमूने तपासण्यात आले आहेत, त्यापैकी 10 लाख 14 हजार 434 नमूने शनिवारी (दि.12) तपासण्यात आले आहेत.

मागील 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक असून, गेल्या 24 तासांत 33 हजार 136 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 94.93 टक्के एवढा आहे तर, 1.45 टक्के एवढा मृत्यूदर आहे.

केरळ मध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासामध्ये 5949 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा 6 लाख 64 हजार 662 पोचला आहे.  तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 80 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता पर्यंत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित सापडले असून हा आकडा 18 लाख 76 हजार 699 पर्यंत पोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.