Pimpri News : कोरोनाचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतरही काळजी घ्या : आयुक्त पाटील

महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी घेतली कोरोनाची लस

एमपीसी न्यूज – कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमितपणे करावा, जेणेकरुन आपण स्वत:चे संरक्षण आणि आजबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेवू शकतो, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. 

आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शुक्रवारी कोरोनाची लस घेतली. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात दोघांनीही लसीचा पहिला डोस घेतला.

त्यानंतर आयुक्त पाटील म्हणाले, मी कोरोनाची लस घेतली आहे. लस सर्व बाबतीत सुरक्षित आहे. त्याबाबत कोणताही संदेह असण्याचे कारण नाही. फ्रंट लाईन, हेल्थ वर्कर यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे.

लसीकरणासाठी दोन दिवसात 50 सेंटर कार्यान्वित करणार
महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरणासाठी 50 सेंटर कार्यान्वित करत आहोत, त्यामुळे 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण करणे सुकर होणार आहे. सर्वांनी आपल्या भागातील लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.