Chinchwad News : उपचाराचा साईड इफेक्ट झाल्याच्या गैरसमजातून डॉक्टरला मारहाण  

एमपीसी न्यूज – डॉक्टरने केलेल्या उपचाराचा साईड इफेक्ट झाल्याच्या गैरसमज मनात निर्माण करून डॉक्टरला मारहाण केली. भोसरी परिसरात मंगळवारी (दि.12) ही घटना घडली. याबाबत डॉक्टरने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गौरव बरमेचा (वय 27, रा. चिंचवडगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरने केलेल्या उपचाराचा साईड इफेक्ट झाला असा गैरसमज आरोपीच्या मनात निर्माण झाला. त्यातून  आरोपीने फिर्यादी डॉक्टरला मारहाण केली व कानाला दुखापत केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.