Pune News : खाजगी रुग्णालयांमध्ये रेमडिसिविर वापराबाबतची तपासणी करण्यासाठी भरारी पथक

एमपीसी न्यूज : महापालिके कडून शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये रेमडिसिविर वापराबाबतची तपासणी करण्यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहेत. या पाहाणीत रेमडिसिविरचा आयोग्य वापर होत असल्यास संबधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

शहरात रेमडिसिविर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रेमडिसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून मोठ्या प्रमाणात रेमडिसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी राज्य शासनाने दिलेल्या गाईडलाईन नुसार रेमडिसिविर इंजेक्शनचा वापर होत का या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.

शहरात ताबालब५० हजार ऍक्टीव्ह रुग्ण असून जवळपास सात हजार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.ज्या कोरोना बाधित रुग्णांची ऑक्सीजन लेव्हल कमी झाली आणि एचआरसीटी स्कोर कमी झाला आहे, त्यांना रेमडिसिविर इंजेक्शनचे पाच डोस देण्यात येतात. महापालिकेसोबतच बहुतांश खाजगी रुग्णालयांना रेमडिसिविर इंजेक्शन पुरवठा करण्यात येतो.

मात्र, सध्या खाजगी रुग्णालयांकडून मोठ्याप्रमाणावर रेमडिसिविरची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्या तुलनेते या इंजेक्शनचा पुरवठा कमी होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव होत आहे. अनेक मेडीकल्स बाहेर रांगा लागू लागल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर खाजगी रुग्णालयांमध्ये राज्य शासनाच्या गाईडलाईन्सनुसार इंजेक्शनचा वापर होतो की नाही याची तपासणी करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.