Bhosari : अवघ्या अर्ध्या तासात दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी (Bhosari) अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 27 मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल जवळ घडली.

राजू विठ्ठल कांबळे (वय 42, रा. संतनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार – सुषमा अंधारे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/एजी 4380) एमआयडीसी भोसरी येथील स्पाईन सिटी मॉल जवळ (Bhosari) रस्त्याच्या बाजूला पार्क केली. अवघ्या अर्ध्या तासात त्यांची दुचाकी चोरीला गेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.