Chikhali News : शहरात अवैध वृक्षतोड सुरुच; चिखलीत वृक्षतोड झाल्याची अपना वतनची तक्रार

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या (Chikhali News) विविध भागात अवैध वृक्षतोड सुरुच असल्याचे दिसून येत आहे. आता चिखली, प्राधिकरण सेक्टर नंबर 18, शिवतेजनगर (खदान) परिसरामध्ये विनापरवाना अवैधरित्या वृक्षतोड झाल्याची तक्रार अपना वतन संघटनेने केली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षतोडीचा पंचनामा करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शिवतेजनगर अवैध वृक्षतोड सुरु असल्याबाबत अपना वतन संघटनेला तक्रार प्राप्त झाल्यांनतर अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख, कार्याध्यक्ष हमीद शेख, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , नीरज कडू यांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी 40 झाडे तोडल्याचे व त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, उद्यान अधीक्षक गोसावी यांना फोन करून याबाबत कल्पना दिली. लेखी तक्रार दिल्याचे शेख यांनी सांगितले.

अपना वतन संघटनेने मागील काही दिवसांपूर्वी फॉर्मायका कंपनीतील अवैध वृक्षतोडीबाबतचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर कंपनी मालकाला 45 लाखाचा दंड थोटवण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच अशा प्रकारेच मोठ्या प्रमाणावर वृक्षांच्या कत्तली करून त्यांची वाहतूक व विक्री करण्यात येत आहे.

सेक्टर नंबर 18, ओयो सिल्व्हर की हॉटेल, शिवतेजनगर, चिखली प्राधिकरण (खदान) याठिकाणी असलेल्या शेकडो झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी बऱ्याच वर्षांपासूनची आंबा, सागवान, लिब, बाभूळ, पिंपळ, वडाची जुनी झाडे अस्तित्वात आहेत.

Talegaon Dabhade Accident : टर्न मारताना अंदाज चुकल्याने ट्रक झाला पलटी

मात्र, उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांकडून येथील (Chikhali News) वृक्षांची मोठ्या प्रमाणवर वृक्षतोड चालू आहे. एकीकडे शासनस्तरावर वृक्ष लागवडीचे संवर्धनाचे उपक्रम सुरु असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वृक्षतोड दुर्लक्ष केली जात आहे. संबंधितांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 कलम ८(१) चे उल्लंघन केले आहे. वृक्षतोड करून संबंधितांनी पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. त्यामुळे या ठिकाणचे जागा मालक, वृक्षतोड करणारे व वृक्षांची वाहतूक करून विक्री करणारे व ते वृक्ष विकत घेणारे वखारीचे मालक या सर्वांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अपना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पालिकेने दंडाबरोबरच गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही संघटनेने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.